30.9 C
Latur
Friday, January 24, 2025
Homeराष्ट्रीयभजनलाल शर्मा यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला

भजनलाल शर्मा यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला

जयपूर : राजस्थानमध्ये मंत्रिमंडळ स्थापनेच्या प्रतिक्षेचा नवा विक्रम प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन भजनलाल शर्मा यांना तब्बल २५ दिवस दिवस झाले आहेत. पण अजूनही मंत्रिमंडळ विस्ताराची स्थिती स्पष्ट झालेली नाही. मुख्यमंत्र्यांकडे सर्व ४५ विभागांची जबाबदारी आहे. दोन उपमुख्यमंत्री शपथ घेतल्यानंतरही ते खात्याशिवाय आहेत. भजनलाल शर्मा यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार २५ दिवसांपासून रखडला आहे. भाजपने राजस्थानमध्ये प्रचारादरम्यान १०० दिवसांत सर्व आश्वासने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते.

मार्चमध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊ शकते. अशा स्थितीत भजनलाल सरकारला काम करण्यासाठी आता अवघे ७५ ते ७७ दिवस उरले आहेत. मंत्रिमंडळाच्या विलंबाने काँग्रेसला दिलासा मिळाला आहे. १०० दिवसांत आश्वासने पूर्ण करण्याची हमी भाजपने राज्यातील जनतेला दिली होती, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. २५ दिवसांपासून राज्यात एकही मंत्री नाही. लोकसभा निवडणुकीत १०० दिवसांत दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्याचा मुद्दा घेऊन काँग्रेस जनतेत जाणार आहे.

माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले की, आता लोकांमध्ये निराशा पसरू लागली आहे, कारण राजस्थानच्या जनतेने ३ डिसेंबरला भाजपला स्पष्ट जनादेश दिला होता, पण २५ दिवस उलटले तरी अद्याप मंत्रिमंडळाची स्थापना झालेली नाही. त्यामुळे कारभार ठप्प झाला आहे. प्रत्येक विभागातही गोंधळाची स्थिती आहे. आपल्या समस्या सोडवण्यासाठी कोणत्या मंत्र्यांकडे जावे याकडे जनतेचे लक्ष आहे. सरकारचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी लवकरात लवकर मंत्रिमंडळ स्थापन करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR