30.6 C
Latur
Saturday, March 2, 2024
Homeराष्ट्रीय‘भारत जोडो’ यात्रा लवकर संपवणार‘

‘भारत जोडो’ यात्रा लवकर संपवणार‘

नवी दिल्ली : राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सध्या सुरु आहे. पण या यात्रेला ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नियोजित वेळापत्रकापेक्षा ही यात्रा लवकर संपवण्यात येणार असल्याचा विचार काँग्रेसकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या सुत्रांच्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशात यात्रेमध्ये बदलण्याचा आणि आरएलडीबाबत घडत असलेल्या घडामोडींचा संबंध नाही. तर राहुल गांधींनी यात्रेदरम्यान लोकांशी जास्तीत जास्त संवाद साधता यावा यासाठी आम्ही त्याचा वेग कमी करण्याचा विचार करत आहोत.

त्यानुसार, २० मार्चपर्यंत मुंबईत संपणार असलेली यात्रा आता १० ते १४ मार्च दरम्यान नियोजित वेळेपेक्षा किमान एक आठवडा आधी संपेल कारण गांधींना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अधिक वेळ मिळेल. सूत्रांनी सांगितले की, प्रियंका गांधी या आत्तापर्यंत या यात्रेत सहभागी झालेल्या नाहीत. पण यात्रा उत्तर प्रदेशात प्रवेश केल्यावर त्या हजेरी लावू शकतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR