15.2 C
Latur
Monday, November 25, 2024
Homeमहाराष्ट्रसकाळी ९ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता

सकाळी ९ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता

मुंबई : पहिली कसोटी हरयाणा, जम्मू काश्मिरमध्ये होती. हरयाणामध्ये तर आपल्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे लोक काल रात्रीपासून स्क्रिप्ट लिहून बसले होते. आम्ही जिंकणार, मग काय बोलणार? सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता. आता काय काय बोलू आणि काय काय नको, असे त्याला वाटते होते, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उबाठाचे नेते संजय राऊतांवर नाव न घेता हल्ला चढवला.

हरयाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. मागच्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपाने सरस कामगिरी केली. त्यामुळे देशभरात पक्षाला बळ मिळाले आहे. विधानसभेची निवडणूक होऊ घातलेल्या महाराष्ट्रातही भाजपाने जल्लोष केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबईत विजयाचे सेलिब्रेशन करण्यात आले. यावेळी बोलताना फडणवीसांनी संजय राऊतांना चिमटे काढले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीनंतर मी सांगितले होते की, आम्ही विरोधी पक्षाशी हरलो नाही. कुठल्याच विरोधी पक्षामध्ये आम्हाला हरवण्याची ताकद नव्हती. आम्हाला हरवले ते चौथा पक्ष होता, फेक नरेटिव्ह नावाचा! त्या फेक नरेटिव्हने आम्हाला पराजीत केले. देशातही आपण लोकसभा जिंकलो. पण, आपल्या ४० जागा कमी झाल्या. याचे कारण फेक नरेटिव्ह होते. पण ज्यादिवशी आपल्या हे लक्षात आले. महाराष्ट्रासहित देशात आपण ठरवले की, आता फेक नरेटिव्हचे उत्तर थेट नरेटिव्हने द्यायचे असे फडणवीस निकालानंतर बोलताना म्हणाले.

मला त्यांना विचारायचे आहे, आता कसे वाटतंय? कारण जनतेशी बेईमानी करून निवडून आलेले हे लोक, आता जनता यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. जे हरयाणामध्ये घडले, तेच महाराष्ट्रामध्ये येत्या नोव्हेंबर महिन्यात घडलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे”, असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी कार्यकर्त्यांशी बोलताना व्यक्त केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR