29.5 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeअंतरराष्ट्रीयबायडेन यांनी मुलाला सेफ केले

बायडेन यांनी मुलाला सेफ केले

ट्रम्प यांची बायडेन यांच्या निर्णयावर टीका

वॉशिंग्टन : अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जाताजाता पोटच्या मुलाचे गंभीर गुन्हे माफ केले आहेत. संभाव्य तुरुंगवासाच्या शिक्षेपासून वाचवले आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडेन यांच्यावर निशाणा साधला असून बायडेन यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे.

पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले, बायडेन यांन आपला मुलगा हंटरला जी माफी दिली आहे. त्यात जे-६ कैद्याचाही समावेश आहे का? जो वर्षानुवर्षे तुरुंगात आहे. ट्रम्प म्हणाले, हा न्यायाचा किती गैरवापर आहे. जे६ कैदी ६ जानेवारी २०२१ रोजी कॅपिटल हिलवर झालेल्या दंगलीतील गुन्हेगार म्हणून तुरुंगात टाकलेल्या लोकांचा संदर्भ देतात. ट्रम्प आणि त्यांच्या समर्थकांनी पकडलेल्या लोकांना ओलीस म्हटले आहे आणि दावा केला आहे की ते शांततेने आणि देशभक्तीने वागत आहेत.

तसेच, असा कयास लावला जात आहे की डोनाल्ड ट्रम्प एकदा अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ते ६ जानेवारी २०२१ रोजी कॅपिटल हिल वेढा प्रकरणी तुरुंगात असलेल्यांना माफी देतील. बायडेन यांनी रविवारी त्यांचा मुलगा हंटरच्या माफीवर स्वाक्षरी केली, हंटरवर बंदुकीबाबतचा गुन्हा आणि कर उल्लंघनाशी संबंधित आरोपांवर दोषी ठरवण्यात आले होते. या गुन्ह्यांसाठी हंटरला यापुढे शिक्षेला सामोरे जावे लागणार नाही.

मुलगा असल्याने लक्ष्य केले : बायडेन
फक्त त्यांचा मुलगा असल्याने त्यांना लक्ष्य करण्यात आले, असा युक्तिवाद बायडेन यांच्या वतीने करण्यात आला. बायडेन म्हणाले की त्यांनी आपल्या कारकिर्दीत एक साधे तत्व पाळले आहे. ते नेहमी न्याय्य असतील. माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे असेही ते म्हणाले. मला वाटते की एका वडील आणि राष्ट्राध्यक्षाने हा निर्णय का घेतला हे अमेरिकन लोकांना समजेल, असेही बायडेन म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR