22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeराष्ट्रीयज्ञानवापी प्रकरणात मुस्लिम पक्षकारांना मोठा धक्का

ज्ञानवापी प्रकरणात मुस्लिम पक्षकारांना मोठा धक्का

अलाहाबाद हायकोर्टाने सर्व याचिका फेटाळल्या

वाराणसी : ज्ञानवापी मशिदीसंदर्भातील प्रकरणात अलाहाबाद हायकोर्टाने आज मुस्लिम पक्षकारांना मोठा धक्का देत सर्व याचिका फेटाळल्या. वाराणसी कोर्टातल्या दाव्याची सुनावणी ६ महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

तसेच मशिदीचे सर्वेक्षण सुरू ठेवण्यासही कोर्टाने अनुमती दिली आहे. सर्व्हे रिपोर्ट कोर्टात दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कारवाइने धार्मिक स्थळांच्या पूजाअर्चनेत बाधा येत नाही असा निर्वाळा हायकोर्टाने दिला. सुन्नी वक्फ बोर्ड या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. तसेच, इंतजामिया कमिटीही सर्वोच्च न्यायालयाची दारे ठोठावणार आहे.

ज्ञानवापी प्रकरणात मुस्लिम पक्षाला अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का देण्यात आला आहे. न्यायालयाने त्यांच्या पाच याचिका फेटाळून लावल्या आहेत, ज्यात टायटल सूटला आव्हान देणा-या मुस्लिम बाजूच्या याचिकेचा समावेश आहे. न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांच्या एकल खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.

दरम्यान, मुस्लिम पक्षकारांच्या वतीने हिंदू पक्षकारांच्या १९९१ च्या खटल्याला आव्हान देणा-या याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या, ज्या न्यायालयाने फेटाळल्या आहेत. अंजुमन इंतेजामिया कमिटी आणि यूपी सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने १९९१ मध्ये वाराणसी कोर्टात दाखल केलेला मूळ खटला कायम ठेवण्याला अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

या प्रकरणी ८ डिसेंबर रोजी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. एकूण ५ याचिकांवर सुनावणी सुरू होती, त्यापैकी २ याचिका सिव्हिल वादावर होत्या आणि ३ याचिका एएसआय सर्वेक्षण आदेशाच्या विरोधात होत्या. दोन याचिकांमध्ये, १९९१ मध्ये वाराणसी जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या मूळ खटला कायम ठेवण्याला आव्हान देण्यात आले होते. न्यायालयाच्या जागेच्या सर्वेक्षणाच्या आदेशाला तीन याचिकांमध्ये आव्हान देण्यात आले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR