28.8 C
Latur
Sunday, March 3, 2024
Homeराष्ट्रीयबिहारमध्ये अजून खेळ व्हायचा आहे; तेजस्वी यादवांचा मोठा दावा

बिहारमध्ये अजून खेळ व्हायचा आहे; तेजस्वी यादवांचा मोठा दावा

पाटणा : बिहारच्या राजकारणात पुन्हा काहीतरी ‘मोठे’ घडणार असून नितीश कुमार महाआघाडी सोडून पुन्हा एकदा एनडीएमध्ये सामील होऊ शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राज्याच्या राजधानीतही बैठकांचा दौरा सुरू असून या मालिकेत राबरी देवी यांच्या निवासस्थानी आरजेडीची बैठक झाली, त्यानंतर तेजस्वी यादव यांनी मोठा दावा केला आहे. बिहारमध्ये अजून खेळ व्हायचा आहे, असे त्यांनी बैठकीत पक्षनेत्यांना म्हटल्याची चर्चा आहे.

या बैठकीला माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद आणि त्यांच्या पत्नी राबडी देवी आणि राज्य विधिमंडळाच्या सदस्यांसह वरिष्ठ नेते उपस्थित होते. तेजस्वी यादव यांनी बैठकीत उपस्थित पक्षाच्या नेत्यांना सांगितले की, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार ‘सन्माननीय’ आहेत. पण अशा अनेक गोष्टी आहेत ज्या त्यांच्या ‘नियंत्रणात’ नसतात. बिहारमध्ये अजून खेळ व्हायचा आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार आदरणीय होते आणि आहेत. महाआघाडीतील आरजेडीच्या मित्रपक्षांनी नेहमीच मुख्यमंत्र्यांचा आदर केला आहे. तेजस्वी यांनी राज्यातील अनेक अनपेक्षित राजकीय घडामोडींचे संकेतही दिले आहेत.

तेजस्वी यादव म्हणाले की, मुख्यमंत्री माझ्यासोबत स्टेजवर बसायचे आणि २००५ पूर्वी बिहारमध्ये काय होते? मी कधीच प्रतिसाद दिला नाही. आता आणखी लोक आमच्यासोबत आहेत. दोन दशकात जे काही अपूर्ण राहिले ते आम्ही साध्य केले. हे फार कमी वेळात केले गेले. मग ते नोकऱ्या असो, जात जनगणना असो. सध्याच्या परिस्थितीत नितीश भाजपसोबत गेल्यास एनडीएला १२७ आमदारांचा पाठिंबा आहे. एआयएमआयएमचा उरलेला एक आमदार जोडला तर आरजेडी आघाडीला ११५ आमदारांचा पाठिंबा आहे. बिहार विधानसभेत जादुई आकडा १२२ आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR