पाटना : बिहारमधील लकडीगंज परिसरातील विषारी दारू प्रकरणातील मृतांचा आकडा हा २६ वर गेला आहे. आतापर्यंत २० जणांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. काही जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे.
बिहारमध्ये दारूबंदी लागू झाली असली तरीही लोक तिथे दारू पीत नाहीत असे नाही, दारू पिणा-यांचे प्रमाणही आहे.
दरम्यान बिहारमध्ये लकडीगंज परिसरातून विषारी दारू घोटाळ्याचे प्रकरण समोर आले आहे. यात आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २० जणांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. काही जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बिहारमध्ये बेकायदेशीर दारूचा व्यापार झपाट्याने वाढत असून सर्वसामान्य नागरिक त्याचे बळी ठरत आहेत. मात्र, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासन व प्रशासन सातत्याने प्रयत्न करत आहे.