27.6 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeलातूर‘कर्मवीरायण’ चित्रपटाचा २८ सप्टेंबर रोजी लातुरात खास शो

‘कर्मवीरायण’ चित्रपटाचा २८ सप्टेंबर रोजी लातुरात खास शो

लातूर (प्रतिनिधी): महाराष्ट्रातील सर्व जातिधर्माच्या गरीब ग्रामीण रयतेला कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आधुनिक शिक्षणाची दारे खुली केली. कर्मवीरांच्या जीवनचरित्राची गाथा सांगणा-या कर्मवीरायण चित्रपटाचा खास शो लातुरात आयोजित करण्यात आला आहे. लातूर कलामंच तर्फे शनिवार, २८ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता श्रीकिशन सोमाणी शाळेच्या कस्तुर- कंचन सभागृहात हा शो होणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शक धनंजय भावलेकर हे ‘कर्मवीरायण’ च्या शो ला उपस्थित राहणार असून चित्रपटानंतर प्रेक्षकांशी संवाद साधतील. हा चित्रपट करण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले आहेत. आपण प्रत्येकांनी हा चित्रपट पाहू‌न कर्मवीर भाऊराव पाटील यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झूंजत तळागाळातील लोकांच्या शिक्षणासाठी केलेले कार्य समजून घेतले पाहिजे. सांस्कृतिक क्षेत्र म्हटले की पुण्याचे नाव प्रथम येते. कधीकाळी त्या खालोखाल लातूरचे नाव होते. पण गेल्या काही दिवसात या क्षेत्रात अजून काम करण्याची गरज होती म्हणून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या काही मित्रांनी मिळून नुकतीच लातूर कलामंच या संस्थेची निर्मिती केली. या मंचचा उद्देश विविध कला विषयक कार्यक्रम करून त्यावर चौफेर चर्चा घडवून आणून रसिकांची अभिरुची विकसित करणे हा आहे.

या चित्रपटाला लातूरकर रसिकांनी अधिकाधिक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन लातूर कलामंच चे अध्यक्ष डॉ अजित जगताप यांनी केले आहे. चित्रपटाच्या प्रवेशिकासाठी रसिकांनी हरिती बुक गॅलरी (मो.७३८५५२१३३६) यांच्याशी संपर्क साधावा.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR