बार्शी : तालुक्यातील धोत्रे येथे स्व. गोपीनाथराव मुंडे यांची जयंती साजरी केली. त्यानिमित्त गोपीनाथराव मुंडे व संत भगवान बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. ह. भ. प. गोरक्षनाथ खाडे महाराज यांनी प्रवचन केले. कार्यक्रमांत धोत्रेचे सरपंच सुमंत जाधवर, उपसरपंच सचिन लांडे, दत्तात्रय जाधवर, हमीद पठाण,गणेश जाधवर यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन रघुजी खाडे यांनी तर राम खराटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
सायंकाळी मिरवणूक काढून संत भगवान बाबांच्या आरतीने कार्यक्रमाचा समारोप झाला. कार्यक्रमासाठी राहुल जाधवर, महादेव जाधवर, बाळासाहेब खराटे, बालाजी पाटील तसेच संत भगवान बाबा मित्र मंडळातील सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. जयंतीसाठी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.