28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeछत्रपती संभाजीनगरभाजपने माझे घर फोडले

भाजपने माझे घर फोडले

कन्नड : कन्नड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष लढणा-या हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात त्यांच्या पत्नी संजना जाधव मैदानात उतरल्या आहेत. भाजपचे माजी केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांना शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. दरम्यान, बायको विरोधात उभारल्यानंतर हर्षवर्धन जाधव यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत असताना भाजपवर जोरदार टीका केली आहे.

हर्षवर्धन जाधव म्हणाले, आमच्या कुटुंबातील एका सदस्याला फोडून एका राजकीय पक्षाने तिकीट दिले. कुठेतरी या सगळ्या गोंधळाच्या पाठिमागे रावसाहेब दानवे आहेत. माझे घर फोडले. माझ्या विरोधात साक्षात माझी पत्नी उभी करण्याचे काम झाले, याचा मी जाहीर निषेध करतो. दिवाळी दोन दिवसांवरती आलेली आहे. सर्वजण आपल्या कुटुंबासमवेत दिवाळी साजरी करत आहेत. माझ्याकडे दिवाळी साजरी करण्यासाठी कोणच उरले नाही. मी आणि माझी आई दोघेचे उरलेलो आहोत. ठोकून काढू शेवटी धर्मयुद्ध आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR