28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeराष्ट्रीयभाजपने सनी देओलचे तिकिट कापले

भाजपने सनी देओलचे तिकिट कापले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी शनिवारी आपल्या उमेदवारांची आठवी यादी जाहीर केली. या यादीत ३ राज्यांतील ११ उमेदवारांची नावे आहेत. पंजाबमधील गुरुदासपूर येथून अभिनेता सनी देओल याचे तिकिट कापण्यात आले आहे.

सनी देओलऐवजी गुरुदासपूरमधून यावेळी दिनेशसिंह बब्बू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बिजू जनता दलातून भाजपमध्ये दाखल झालेल्या भर्तृहरी मेहताब यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. मेहताब यांच्यासह ओडिशातून ३, पंजाबमधून ६ आणि पश्चिम बंगालमधून २ उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली आहे. ओडिशातील जाजपूर, कंधहाल, कटक येथून अनुक्रमे रवींद्र बेहरा, सुकांत पाणीग्रही आणि भर्तृहरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

या तिन्ही मतदारसंघांतील विद्यमान खासदारांची तिकिटे कापण्यात आली आहेत. आठव्या यादीसह भाजपने आजअखेर ४१७ उमेदवारांची घोषणा केली आहे.

माजी राजदूतास उमेदवारी
पंजाबातील जालंदरहून सुशील रिंकू, लुधियानाहून रवनीतसिंह बिट्टू, पतियाळाहून परनीत कौर, फरिदकोटहून हंसराज हंस हे उमेदवार असतील. अमृतसरहून अमेरिकेतील भारताचे माजी राजदूत तरणजितसिंह संधू यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR