17.5 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeराष्ट्रीयकर्नाटकात भाजप ‘ऑपरेशन लोटस’ चालवतोय

कर्नाटकात भाजप ‘ऑपरेशन लोटस’ चालवतोय

मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनंतर शिवकुमारांचा दावा

बंगळूरू : कर्नाटकातील काँग्रेस सरकार पुन्हा एकदा संकटात आले असल्याचा दावा करण्यात आला आहे. कर्नाटकात ‘ऑपरेशन लोटस’ होणार असल्याचा दावा खुद्द मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला आहे. या अंतर्गत भाजप त्यांचे सरकार पाडणार होते असा आरोप करण्यात आला आहे.

राज्य सरकार पाडण्यासाठी भाजपने काँग्रेसच्या ५० आमदारांना प्रत्येकी ५० कोटी रुपयांची ऑफर दिली आहे असा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला. यानंतर आता उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनीही हाच दावा केला आहे. भाजपने काँग्रेसच्या ५० आमदारांना प्रत्येकी ५० कोटी रुपयांचे आमिष दाखवले आहे, असा दावा डीके शिवकुमार यांनी केला.

डीके शिवकुमार यांनी सांगितले की, भाजपच्या कथित ऑपरेशन लोटसबद्दल काँग्रेस आमदारांना माहिती देण्यात आली होती. आमच्या काही आमदारांनी मुख्यमंत्र्यांना या प्रकरणाची माहिती दिली आणि त्यांनी ती मीडियाशी शेअर केली असेही शिवकुमार म्हणाले. म्हैसूर येथील एका कार्यक्रमात सिद्धरामय्या यांनी काँग्रेसच्या एकाही आमदाराने प्रस्ताव स्वीकारला नाही असा दावा पुन्हा केला. ऑपरेशन लोटस हा शब्द भाजपने घोडे- बाजारद्वारे सत्ताधारी सरकारांना अस्थिर करण्याच्या प्रयत्नांसाठी वापरला आहे.

मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपवर आपले सरकार पाडण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप केला आहे. भाजपने आमचे सरकार अस्थिर करण्यासाठी आमच्या आमदारांना मोठ्या प्रमाणात पैशाचे आमिष दाखवले, असे ते म्हणाले. तसेच, भाजपने प्रत्येक आमदाराला ५० कोटी रुपयांची ऑफर दिली आणि जवळपास ५० आमदाराना विकत घेण्याचा प्रयत्न केला, असा दावा सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केला.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, हा पैसा येतोय कुठून? बीएस येडियुरप्पा आणि बोम्मई नोटा छापत आहेत का? या पैशाचा स्रोत काय? हा भ्रष्टाचाराचा पैसा आहे, जो भाजप नेत्यांकडे जमा झाला आहे. त्या पैशाचा वापर करून आमचे आमदार विकत घेत आहेत. भाजपच्या या प्रस्तावासाठी आमचे आमदार तयार नाहीत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, भाजपचा हा प्लॅन अयशस्वी ठरल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांची प्रतिमा डागाळण्याचे आणि त्यांना सत्तेवरून हटवण्याचे प्रयत्न सुरू केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR