28.5 C
Latur
Saturday, October 26, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपचा सुपडा साफ करणार;आमदार प्रतिभा धानोरकर

भाजपचा सुपडा साफ करणार;आमदार प्रतिभा धानोरकर

चंद्रपूर : प्रतिनिधी
चंद्रपूरमधून आमदार प्रतिभा धानोरकर यांनी मुनगंटीवार यांचा २ लाख ६० हजार मतांनी पराभव केला. लोकसभेचा निकाल लागल्यानंतर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मतदारसंघात आभार दौरा काढला. यामध्ये त्यांनी डरकाळी फोडत येत्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचा चंद्रपूर जिल्ह्यातून सुपडा साफ करणार असल्याचे म्हटले.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसने दमदार कामगिरी करत एका जागेवरून १३ जगांवर झेप घेतली. या निवडणुकीत भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांसह राज्यातील मंत्र्यांनाही पराभवाची चव चाखावी लागली. यामध्ये सर्वाधिक मताधिक्याने पराभव स्वीकारावा लागला तो राज्यातील कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना.

यावेळी बोलताना धानोरकर म्हणाल्या, येत्या विधानसभेत जिल्ह्यातील सहा विधानसभेत मीच उमेदवार आहे असे समजून पक्षाचे काम करणार आहे. आणि यामध्ये सहाही विधानसभेत भाजपचा सुपडा साफ नाही केला तर प्रतिभा धानोरकर नाव लावणार नाही.
आतापर्यंत काँग्रेसचे मंत्रिपद गडचिरोली जिल्ह्याला मिळत होते. पण यावेळी ते चंद्रपूर जिल्ह्याला कसे मिळेल यासाठी प्रयत्न करणार आहे, असेही खासदार धानोरकर यांनी स्पष्ट केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR