27.6 C
Latur
Monday, April 22, 2024
Homeमहाराष्ट्रभाजप आता युवा स्वाभिमान पक्ष संपविणार

भाजप आता युवा स्वाभिमान पक्ष संपविणार

अमरावती : नवनीत राणा यांचे अंतर्मन भाजपाचेच आहे. आधी नवनीत राणा या हिरवा, भगवा आणि निळा झेंडा घेऊन लढत होत्या. आता त्या भगवा झेंडा घेऊन फिरतात. हिंदू शेरणी झाल्या आहेत. भाजप हे आता नवनीत आणि रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष संपविणार आहे. भाजपमध्ये जाऊन त्यांचा स्वाभिमान संपवला नाही पाहिजे, अशी टीका प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी भाजपवर केली आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. अशात खासदार नवनीत राणा यांच्या नावाचीही चर्चा आहे. यावर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी भाजपच्या हेतूवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. महायुतीतील जागावाटपावर बच्चू कडू यांनी भाष्य केले आहे. तसेच वंचित आघाडी ही महाविकास आघाडीत सामील होऊ शकते. तशी चर्चा सध्या सुरू आहे. यावर बच्चू कडूंनी प्रतिक्रिया दिली आहे.

प्रकाश आंबेडकर यांची वंचित आघाडी स्वतंत्र लढत असेल म्हणून ते महाविकास आघाडीच्या बैठकीला जात नसतील, असे बच्चू कडू म्हणाले. प्रहारचा मुख्यमंत्री झाल्यावर व्यवस्था बदलणार आहे. आमच्या मतदारसंघात सव्वा लाख लोकांना पगार देतोय, असा विश्वासही बच्चू कडू यांनी व्यक्त केला.

जोपर्यंत विधानसभेची बोलणी होत नाही तोपर्यंत आम्ही कोणताही विचार केला नाही. भाजपला जशी लोकसभा महत्त्वाची तशी आम्हाला विधानसभा महत्त्वाची आहे. लहान पक्षांसोबत अजूनही कोणतीही चर्चा झाली नाही. विधानसभेमध्ये किती जागा देणार हे सांगावे. नाही तर आम्ही स्वतंत्र आहोत..आम्हाला कुठलेही बंधन नाही. काँग्रेसमध्ये देखील पानदान झाले आहे. सगळ्या फांद्या तुटल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR