27.1 C
Latur
Tuesday, May 28, 2024
Homeमहाराष्ट्रभाजप कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या; मुख्य आरोपी अटकेत

भाजप कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या; मुख्य आरोपी अटकेत

मुंबई : उत्तर प्रदेशात भाजप कार्यकर्त्याच्या हत्या प्रकरणी मुख्य आरोपी आणि सूत्रधाराला मंगळवारी रात्री पोलिसांनी अटक केली. मुंबईतील भिवंडीतून आरोपीला अटक करण्यात आली असून आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या हत्या प्रकरणातील इतर आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये भाजप कार्यकर्ता आणि पत्रकाराची गोळी मारून हत्या केली होती. गोळी मारणा-या आरोपीला भिवंडीतून अटक केली आहे. आशुतोष श्रीवास्तव याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी शहागंज पोलिस स्टेशन, जिल्हा जौनपूर येथे गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी जमरूद्दीन हानिफ कुरेशी याला भिवंडीतून अटक झाली आहे. भिवंडी क्राईम ब्रँच आणि शहागंज पोलिसांनी संयुक्त कारवाई केली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, आशुतोष श्रीवास्तव हे भाजपचे नेते असून ते पत्रकारसुद्धा आहेत. त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी एकूण ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मोठा खुलासा झाला असून मंगळवारी रात्री सूत्रधाराला अटक झाली आहे. पोलिसांनी जमीरुद्दीन कुरैशी याला अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या सहका-याने सूत्रधार आणि मुख्य आरोपी असलेल्या जमीरूद्दीनला ताब्यात घेतले गेले. त्याच्यावर १६ हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR