24.1 C
Latur
Friday, January 24, 2025
Homeमहाराष्ट्रभाजपकडून लोकशाही संपविण्याचा प्रयत्न

भाजपकडून लोकशाही संपविण्याचा प्रयत्न

रोहित पवार यांची टीका

पुणे : भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला शरद पवारांची कारकीर्द संपवायची आहे, असे बोलून दाखवले आहे. त्यामुळे भाजप आमच्या जवळच्या लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शरद पवार यांच्यावर निशाणा धरत आहे. आमच्याच कुटुंबातील लोकांचा वापर करून भाजप पवार यांना राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्याच्या प्रयत्नात आहे, अशी टीका करत जनता पवार साहेबांबरोबर असल्याने सुप्रिया सुळे तीन लाखांपेक्षा जास्त मतांनी बारामतीमधून निवडून येतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व आमदार रोहित पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

ते म्हणाले, ‘‘श्रीनिवास पाटील आजारी असल्याने साता-यात दुसरा सक्षम उमेदवार दिला जाईल. त्याची घोषणा लवकरच करू. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीबरोबर यावे, अशी आमची इच्छा आहे. ते स्वतंत्रपणे लढल्यास भाजपचा फायदा होईल. तसे ते करतील, असे वाटत नाही.’’ कसबा पोटनिवडणुकीत भाजपकडून गुंडांचा वापर करण्यात आला. तरीही रवींद्र धंगेकर निवडून आले. पैसा, गुंडांचा वापर करून लोकशाही संपविण्याचा प्रयत्न भाजप व त्यांचे इतर मित्रपक्ष करत आहेत. धंगेकरांबरोबर सामान्य जनता असल्याने त्यांचा विजय निश्चित आहे, असेही ते म्हणाले.

तटकरे सिंचनाच्या चिखलात अडकलेले नेते
वयाने मी लहान असल्याने सुनील तटकरे मला बालवाडीचे अध्यक्ष म्हणत असतील. पण ते सिंचनाच्या चिखलात अडकलेले नेते आहेत. त्या चिखलातून बाहेर निघण्याची बुद्धी त्यांच्याकडे नक्की आहे. एका घराच्या पत्त्यावर शंभर कंपन्या कशा? भाजपबरोबर जाऊन स्वत:वरील कारवाया थांबवायच्या, हे काम त्यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR