नवी दिल्ली : भाजपकडून लोकसभेसाठी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतला भाजपकडून लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्याता आली आहे. यासोबत महाराष्ट्रातील तीन उमेदवारांची नावे भाजपने जाहीर केली आहे. भंडारा-गोंदिया मतदारसंघात सुनील मेंढे यांना लोकसभेचे तिकीट देण्यात आले आहे. त्यासोबतच, गडचिरोली-चिमूर अशोक महादेवराव नेते आणि सोलापूरमधून राम सातपुते यांना भाजपने लोकसभेसाठी उमेदवारी दिली आहे.
भाजपने लोकसभेसाठी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. यामध्ये १११ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे यामध्ये मंडी लोकसभा मतदारसंघातून बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतला भाजपने उमेदवारी दिली आहे. या १११ भाजप उमेदवारांमध्ये तीन उमेदवारी महाराष्ट्रातील आहेत.
मंडी – कंगना राणौत
भंडारा-गोंदिया – सुनील बाबुराव मेंढे
गडचिरोली-चिमूर – अशोक महादेवराव नेते
सोलापूर – राम सातपुते