29.7 C
Latur
Saturday, April 13, 2024
Homeराष्ट्रीयभाजपचे विकासाचे नव्हे तर विनाशाचे मॉडेल

भाजपचे विकासाचे नव्हे तर विनाशाचे मॉडेल

नवी दिल्ली : भाजपने देशाला विकासाचे नव्हे तर विनाशाचे मॉडेल दिले केवळ अरबपती मित्रांच्या मदतीसाठी मोदी मॉडेल असल्याचा घणाघाती हल्ला मुख्यमंत्री अरंिवद केजरीवाल यांनी आज दिल्ली विधानसभेत केला.

दिल्ली विधानसभेच्या विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री केजरीवाल यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट हल्ला केला. विकासाच्या सर्व आघाड्यांवर देश आज रसातळाला जात आहे. देशाची आर्थिक स्थिती खराब आहे, बेरोजगारीचा दर सर्वाधिक आहे, शेतकरी आपल्या हक्कासाठी रस्त्यावर आहे, महिला सुरक्षित नाही, केवळ आणि केवळ पंतप्रधान मोदी अरबपती मित्रांना मदत करीत आहेत. हेच त्यांचे विकासाचे मॉडेल आहे. आम्ही महिलांना दरमहिन्याला हजार रुपये देतो. ते अरबपतींची झोळी भरतात.

केजरीवाल म्हणाले, विरोधकांना संपविण्यासाठी ईडी व सीबीआयचा वापर केला जात आहे. मला आतापर्यंत ८ वेळ समन्स आले आहे. आता नववा समन्स येणार असल्याचे समजते. परंतु प्रत्येक समन्सनंतर मी दिल्लीत एक नवी शाळा उभारत आहे. या विकासाला विरोध करण्यासाठी भाजप प्रयत्न करीत आहे. भाजपला विकास नको तर विनाशाचे मॉडेल राबविण्यात स्वारस्य असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR