31.5 C
Latur
Tuesday, March 18, 2025
Homeमहाराष्ट्रडोंबिवलीत भाजपचे कार्यालय फोडले

डोंबिवलीत भाजपचे कार्यालय फोडले

डोंबिवली : प्रतिनिधी
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार अखेरच्या टप्प्यात आला आहे. प्रचाराला आता धार आली असून नेत्यांकडून परस्परांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या प्रचाराच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण तापू लागले आहे.
काही मतदारसंघांत धक्काबुक्की, हाणामारी झाल्याच्या बातम्या येत आहेत. आता डोंबिवलीत भाजपा कार्यालयाची तोडफोड करण्यात आल्याचे वृत्त आहे.

डोंबिवलीत भाजप कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. डोंबिवली पश्चिमेतील गृजराती सेलचे पदाधिकारी जुगल उपाध्याय यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली.

तीन ते चार अज्ञात व्यक्ती अचानक तिथे धडकल्या. त्यांनी शिवीगाळ केली. मारहाण करून तोडफोड केली. डोंबिवली विधानसभेत कॅबिनेट मंत्री भाजपा महायुतीचे उमेदवार रवींद्र चव्हाण आणि ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रे यांच्यात थेट लढत आहे. तोडफोडीची ही घटना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली आहे.

मागच्या काही दिवसांपासून डोंबिवलीतील राजकीय वातावरण तापले होते. भाजपामधील सूत्रांनी या तोडफोडीचे खापर विरोधकांवर फोडले आहे. डोंबवलीत मागच्या तीन टर्मपासून रवींद्र चव्हाण आमदार आहेत. २००९ पासून ते सातत्याने डोंबिवलीमधून विधानसभेची निवडणूक जिंकत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR