19.2 C
Latur
Tuesday, November 12, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपची ‘सायलेंट फोर्स’ निवडणुकीच्या आखाड्यात

भाजपची ‘सायलेंट फोर्स’ निवडणुकीच्या आखाड्यात

मुंबई : विशेष प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप आणि मित्रपक्षांना मोठा फटका बसला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ निवडणुकीत फारसा सक्रिय झाला नाही. त्याचे परिणाम भाजपला भोगावे लागले. मिशन ४५ हाती घेणारी महायुती केवळ १७ वर थांबली. तर महाविकास आघाडीने ३० जागांवर मुसंडी मारली. यानंतर आता विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपची ‘सायलेंट फोर्स’ सक्रिय झाली आहे.

‘बटेंगे तो कटंगे’ ही घोषणा सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी संघाचे स्वयंसेवक बरीच मेहनत घेत आहे. संघाच्या लोक जागरण मंचाकडून लोकांमध्ये पत्रके वाटली जात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालातून धडा घ्या आणि विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्त्वातील महायुतीला विजयी करा, असे आवाहन स्वयंसेवकांकडून करण्यात येत आहे. संघाशी संबंधित असलेल्या ६५ संघटना प्रचारात सक्रिय झाल्या आहेत.

संविधान, आरक्षण, अनुसूचित जाती आणि जमाती यांच्याबद्दल विरोधकांकडून केला जाणारा प्रचार खोटा आहे. त्यापासून सावध राहा, त्याला बळी पडू नका, असा मजकूर असलेली पत्रकं वाटण्यात येत आहेत. जमीन जिहाद, लव जिहाद, धर्मांतरण, दगडफेक, दंगली रोखण्याचं काम करणारं सरकार निवडा, असा प्रचार संघाकडून केला जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण राहुल गांधी परदेशात जाऊन देशाची बदनामी करतात, हा मुद्दा स्वयंसेवक दोन्ही नेत्यांचं नाव न घेता लावून धरत आहेत. संघाचे स्वयंसेवक राज्यभरात ५० हजार ते ७० हजार लहान लहान बैठका घेत आहेत. हरियाणात संघाची अदृश्य शक्ती भाजपच्या कामी आली. हातातून पूर्णपणे निसटलेली निवडणूक भाजपने संघाच्या मदतीने जिंकली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR