22.4 C
Latur
Tuesday, July 23, 2024
Homeमहाराष्ट्रनागपूरमध्ये स्फोटकं बनवणा-या कंपनीत स्फोट; ५ कामगारांचा मृत्यू

नागपूरमध्ये स्फोटकं बनवणा-या कंपनीत स्फोट; ५ कामगारांचा मृत्यू

नागपूर : प्रतिनिधी
जिल्ह्यात एका स्फोटके बनवणा-या कंपनीत स्फोट होऊन ५ कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. नागपूरमधील चारमुंडी कंपनीमध्ये स्फोट झाला आहे. यात ५ जण जखमी असून तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. बुधवारी डोंबिवलीमध्ये एका कंपनीत स्फोट झाला होता. त्यानंतर आता नागपूरमध्ये देखील अशी घटना घडली आहे.

माहितीनुसार,५ कामगार मृत्युमुखी पडले आहेत.५ जण जखमी आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नागपूर जिल्ह्यातील ठामणा येथे चारमुंडी नावाची स्फोटकं बनवणारी कंपनी आहे. याठिकाणी दुपारी दीडच्या सुमारास स्फोट झाला. यात ५ कामगारांचा मृत्यू झाला आहे. तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.

पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. आग विझविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, कोणालाही आतमध्ये जाऊ दिले जात नाही. स्फोटकं आतमध्ये असल्याने याची खबरदारी घेतली जात आहे. स्फोट कसा झाला याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. पण, कंपनीमध्ये आठ जण काम करत होते अशी माहिती आहे. स्फोटाची माहिती मिळताच कामगारांचे कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी गर्दी केली आहे. आमदार अनिल देशमुख याठिकाणी दाखल झाले आहेत. याप्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR