22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeअंतरराष्ट्रीयअटलांटिक महासागरात बुडाली बोट, ६ मच्छिमारांचा मृत्यू, ७ जण बेपत्ता

अटलांटिक महासागरात बुडाली बोट, ६ मच्छिमारांचा मृत्यू, ७ जण बेपत्ता

नवी दिल्ली : दक्षिण अटलांटिक महासागरात एक मासेमारी बोट बुडाली आहे. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून सात जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम राबवली जात आहे.

फॉकलंड बेटांच्या किना-यापासून सुमारे २०० मीटर अंतरावर मंगळवारी हा अपघात झाला. ब्रिटिश आणि स्पॅनिश सागरी अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बोटीत एकूण २७ लोक होते. सर्वजण समुद्रात मासे पकडण्यासाठी जात होते. दरम्यान, फॉकलंड बेटांच्या किना-यापासून सुमारे २०० मैल दूर बोट बुडाली.

स्पेनच्या अधिका-यांनी सांगितले की, अर्गोस जॉर्जिया नावाचे जहाज अर्जेंटिनाजवळ दक्षिण अटलांटिक महासागरात बुडाले. त्यांनी सांगितले की जहाज १७६ फूट लांब होते. या दुर्घटनेनंतर परिसरात मासेमारी करणा-या मच्छिमारांनी आपल्या बोटीसह १४ जणांचे प्राण वाचवले. आग्नेय गॅलिसियामधील स्पेनच्या पोन्टेवेद्रा प्रांतातील अधिका-यांनी १० क्रू सदस्यांना स्पॅनियार्ड म्हणून ओळखले, क्रू मेंबर्सपैकी बरेच जण इतर देशांतीलही होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR