23.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeअंतरराष्ट्रीयपाकिस्तानात बॉम्बस्फोट; ५ पोलिस ठार, २० नागरिक जखमी

पाकिस्तानात बॉम्बस्फोट; ५ पोलिस ठार, २० नागरिक जखमी

खैबर पख्तुनख्वा : पाकिस्तानात (सोमवारी) झालेल्या बॉम्बस्फोटात ५ पोलिस ठार झाले आहेत. या स्फोटात २० पेक्षा अधिक नागरिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. पोलिस संरक्षण दलाला टार्गेट ठरवून हा हल्ला करण्यात आला.

बाजौर जिल्ह्यातील मामुंद परिसरात पोलिओविरोधी मोहिमेसाठी कर्तव्यावर असलेल्या पोलीस पथकाला ट्रकमधून नेले जात असताना हा हल्ला करण्यात आला.

मामुंद परिसर अफगाणिस्तानच्या सीमेला लागून आहे. २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यापासून पाकिस्तानी सीमा भागात हल्ले वाढले आहेत. या हल्लयात पाकिस्तानी तालिबानचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, रविवारी पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चार जण ठार झाले होते. अज्ञात बंदूकधा-यांनी दोन वाहनांवर अंदाधुंद गोळीबार केला होता. उपलब्ध माहितीनुसार २०२३ मध्ये पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामध्ये ४१९ दहशतवादी हल्ले झाले, ज्यामध्ये ६२० लोक मारले गेले. ठार झालेल्यांमध्ये ३०६ सुरक्षा कर्मचारी, २२२ नागरिक आणि ९२ दहशतवादी यांचा समावेश आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR