27.5 C
Latur
Sunday, July 14, 2024
Homeमहाराष्ट्ररील्सच्या नादात दोघांनी गमावला जीव

रील्सच्या नादात दोघांनी गमावला जीव

नागपूर : गेल्या काही दिवसांमध्ये हिट अँड रनच्या आणि अपघाताच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशातच नागपुरमधून एक धक्कादायक घटनासमोर आली आहे. नागपूर कोराडीजवळील पाझरा गावात एक कार उलटल्याने भीषण अपघात झाला आहे. रील बनवताना हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या कारमध्ये बनवलेले रील आता समोर आले आहे. या रीलमध्ये कारचालक बेशिस्तपणे कार चालवत असल्याची माहिती समोर आली आहे.

अपघात झालेल्या कारमध्ये चालक व्यवस्थित कार चालवत नसल्याचे दिसत आहे, त्याचबरोबर कारमध्ये मोठ्या आवाजत गाणी सुरू असल्याचंही दिसून येत आहे. ही कार रेलिंगला धडकल्याने भीषण अपघात झाला. त्यामध्ये २ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर ३ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमी झालेल्यांमध्ये भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पीएच्या मुलाचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

यामध्ये तरूण विचित्र पध्दतीने कार चालवत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३ जण जखमी झाले आहेत. रील बनवण्याच्या नादात हा अपघात झाला आहे. रील बनवणे दोन जणांच्या जीवावरती बेतले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये रील बनविण्याच्या नादात अनेक अपघात झाल्याचे समोर आले आहे. मात्र, अद्याप तरूणाई या गोष्टीला गांभीर्याने पाहत नसल्याचं दिसून येत आहे. हा अपघात भरधाव गाडीमुळे झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR