26.7 C
Latur
Sunday, December 29, 2024
Homeमनोरंजनउर्मिला कोठारे यांच्या कारने दोघांना उडविले

उर्मिला कोठारे यांच्या कारने दोघांना उडविले

मुंबई : प्रतिनिधी
अभिनेत्री उर्मिला कोठारेंच्या कारचा भीषण अपघात झाला असल्याची धक्कादायक माहिती सध्या समोर येत आहे. उर्मिलाच्या कारने २ मजुरांना उडवले असल्याचीही माहिती आहे. यामध्ये एका मजुराचा मृत्यू झाला तर दुसरा मजूर गंभीर जखमी झाला. उर्मिला आणि तिचा ड्रायव्हरही या अपघातात जखमी झाल्याची माहिती आहे.

शुटिंग संपवून घरी परतत असताना उर्मिलाच्या कारचा हा अपघात झाला. या अपघातात उर्मिलाही गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गाडीची एअर बॅग योग्य वेळी उघडल्याने अभिनेत्रीचा जीव वाचला, असे असले तरीही तिच्या कारचा मात्र चक्काचूर झाला असून यामध्ये एकाचा मृत्यू झाला. मुंबईतील कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडली.

मेट्रोमध्ये काम करणा-या दोन मजुरांना भरधाव कारने धडक दिली, या घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला तर दुसरा मजूर गंभीर जखमी झाला. अभिनेत्री उर्मिला काल रात्री तिचे शूटिंग संपवून कारमधून घरी जात होती. त्यावेळी हा अपघात घडला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR