25.3 C
Latur
Friday, June 21, 2024
Homeपरभणीलाचखोर पोलिस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

लाचखोर पोलिस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

परभणी : आरोपी लोकसेवक श्रेणी पो.उप.नि जंत्रे यांनी तक्रारदार यांचे रेतीचे ट्रक व ट्रक चालकास रेतीची वाहतूक करताना पकडले होते. सदर गुन्ह्यातील जप्त ट्रक सोडविण्याकरिता न्यायालयात अहवाल सादर करण्याकरिता आरोपी लोकसेवक जंत्रे यांनी तक्रारदार यांना १ लाख रुपयांची मागणी केली होती. सदर रक्कम ही लाच असून तक्रारदार यांना ती देण्याची इच्छा नसल्याने दि. १९ मे रोजी यांनी एसीबी परभणी येथे तक्रार दिली. दरम्यान मंगळवार दि. २१ मे रोजी आरोपीस मानवत येथे पंचासमक्ष लाच स्विकारताना एसीबीने अटक केली आहे.

न्यायालयात रिपोर्ट दाखल करण्यासाठी तडजोडी अंती ७० हजारांची लाचेची मागणी आरोपी लोकसेवक जंत्रे यांनी केली होती. त्यापैकी पहिला हप्ता ५०,०००/- रू. तेथे हजर असलेला आरोपी खासगी इसम मुंतसिर पठाण उर्फ बब्बुभाई याच्याकडे देण्यास सांगितले. उर्वरित २०,०००/- रू .न्यायालयात रिपोर्ट सादर केल्यानंतर द्या असे म्हणून लाच मागणी केली होती. दरम्यान पंचासमक्ष करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान आरोपी खाजगी इसम पठाण यांनी मोटारसायकलवर बसून तक्रारदार यांचे कडून लाचेची रक्कम ५०,०००/- रू. स्विकारून ते लाचेच्या रक्कमेसह पळून गेला.

आरोपी पठाण यांचा मानवत शहरात शोध घेऊन त्यालाही शिताफीने ताब्यात घेतले असून आरोपी लोकसेवक जंत्रे, तृतीय श्रेणी पोलिस उपनिरीक्षक यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या मानवत येथील घराची घरझडती घेतली असता नगदी रोख रक्कम ७४,५०० रुपये आढळून आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान पो.स्टे.मानवत जि.परभणी येथे गुन्हा दाखल करण्याची पुढील प्रक्रिया सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR