21.5 C
Latur
Wednesday, February 12, 2025
Homeमहाराष्ट्रबसचे टायर फुटल्याने अपघात; ५ महिला जखमी

बसचे टायर फुटल्याने अपघात; ५ महिला जखमी

धुळे : दोंडाईचा आगारातील लामकानी मुक्कामाला जाणा-या बसचे टायर फुटल्याने अपघात झाला आहे. बस रस्त्याच्या कडेला असणारा कठडा तोडून खाली उतरली. त्यामुळे पाच महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत.

चालकाने वेळीच नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला आहे. जखमींना तात्काळ उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. चालक संजय बुधा कोळी हे दोंडाईचा बसस्थानकातून ३५ प्रवासी घेऊन वाडीमार्गे लामकानी येथे जात होते. शहरातील मांडळ चौफुलीपासून एक किलोमीटर अंतरावर घटना घडली.

बस (एमएच ०६, एस ८६१४) सायंकाळी सहाला बसस्थानकातून निघाली होती. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अचानक डाव्या बाजूकडील पुढचे टायर फुटल्याने बस रस्त्यावरून खाली उतरली. पाच फूट अंतरावरच विजेचा खांब होता. सुदैवाने बस थांबल्याने मोठी दुर्घटना टळली.
जनाबाई गोविंद पाटील (रा. मांडळ), आशाबाई विजय गोडसे (अंजनविहरे), वत्सलाबाई हिलाल पाटील ( मांडळ), ललिताबाई संतोष चव्हाण (अंजनविहरे), अरुणाबाई सुरेश पाटील (मांडळ) या पाच महिला किरकोळ जखमी झाल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR