23.3 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeराष्ट्रीयवर्ष अखेरीस भारतीय रस्ते अमेरिकेसारखे बनतील

वर्ष अखेरीस भारतीय रस्ते अमेरिकेसारखे बनतील

नवी दिल्ली : लवकरच भारताचे रस्ते अमेरिकेसारखे होतील. देशातील रस्ते आणि महामार्ग सुधारण्यासाठी भारत सरकार दिवसेंदिवस काम करत आहे. त्याच बरोबर तो दिवस दूर नाही जेव्हा भारताचे रस्ते अमेरिकेसारखे होतील असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. गडकरी यांनी एका कार्यक्रमात सांगितले की, देशाला विकसित देश बनविण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यात रस्त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे.

या वर्षाच्या अखेरीस भारताचे रस्त्यांचे जाळे अमेरिकेसारखेच चमकदार होईल. केंद्र सरकार देशभरात ३६ एक्सप्रेस हायवे बांधत आहे, ज्यामुळे वेगवेगळ्या शहरांमधील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल. दिल्ली ते चेन्नईला जोडणा-या महामार्ग प्रकल्पाच्या निर्मितीमुळे दोन्ही शहरांमधील अंतर ३२० किमीने कमी होईल असेही गडकरी म्हणाले. आसाममधील नुमालीगडमध्ये बांबूपासून इथेनॉल तयार केले जात आहे. इंधनातील बदलामुळे आणि चांगल्या रस्त्यांच्या विकासामुळे, देशातील लॉजिस्टिक खर्च एक अंकी कमी होईल, अशी माहिती गडकरी यांनी दिली.

विकासाला सर्वोच्च प्राधान्य
केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, एक गोष्ट स्पष्ट आहे की भांडवली गुंतवणूक आणि उद्योगाचा विकास हवा असेल तर चांगल्या पायाभूत सुविधा हव्यात. पाणी, वीज, वाहतूक आणि दळणवळण याशिवाय आपण शेती, सेवा आणि उद्योगाचा विकास करू शकत नाही. पायाभूत सुविधांशिवाय पर्यटनाचा विकास होऊ शकत नाही. २०१४ मध्ये मोदीजी पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी देशातील पायाभूत सुविधांच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले.

आसाम राज्यात बांबूपासून इथेनॉल तयार
जेव्हा आपण एक महान देश विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे, तेव्हा आपल्याला जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा देखील विकसित कराव्या लागतील आणि त्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. ईशान्येकडील आसाम राज्यात बांबूपासून इथेनॉल तयार केले जात आहे असेही नितीन गडकरी म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR