18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयमध्य प्रदेशात मंत्रिमंडळ विस्तार; २८ मंत्र्यांनी घेतली शपथ

मध्य प्रदेशात मंत्रिमंडळ विस्तार; २८ मंत्र्यांनी घेतली शपथ

भोपाळ : मध्य प्रदेशात सोमवारी मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. कैलाश विजयवर्गीय यांच्यासह अनेक आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याशिवाय मंत्रिमंडळात राजेंद्र शुक्ला आणि जगदीश देवरा हे दोन उपमुख्यमंत्री आहेत. शपथ घेतलेल्या २८ मंत्र्यांपैकी १८ कॅबिनेट मंत्री, ४ राज्यमंत्री आणि ६ स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आहेत. तसेच १२ मंत्री ओबीसी प्रवर्गातील आहेत.

विश्वास सारंग, कृष्णा नगर, इंदर सिंह परमार, नागर सिंह चौहान, प्रतिमा बागरी, संपतिया उईके आणि राधा सिंह यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्र्यांसह जास्तीत जास्त ३५ कॅबिनेट सदस्य असू शकतात. मोहन यादव म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विजय मिळवल्यानंतर, आमचे दुहेरी इंजिन सरकार त्यांच्या नेतृत्वात पुढे जाईल. गेल्या महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला १६३ तर काँग्रेसला ६६ जागा मिळाल्या होत्या. यादव यांच्याशिवाय शुक्ला आणि देवरा यांनी १३ डिसेंबरला मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR