22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeराष्ट्रीयअनोळखी महिलेला डार्लिंग म्हणणे हा लैंगिक छळच

अनोळखी महिलेला डार्लिंग म्हणणे हा लैंगिक छळच

कोलकाता : कोलकाता हायकोर्टाने एका प्रकरणामध्ये टिपण्णी करत अनोळखी महिलेला डार्लिंग म्हणणे लैंगिक अत्याचार असल्याचे म्हटले आहे. आयपीसीच्या कलम ३५४ अ(१) नुसार हा गुन्हा ठरतो असे कोर्टाने नमूद केले आहे.

एका प्रकरणामध्ये दोषी आणि अपिलकर्ता जनक राम याची शिक्षा न्यायमूर्ती जय सेनगुप्ता यांनी कायम ठेवली आहे. ही घटना एका महिला पोलिस कर्मचा-याच्या बाबतीत घडली होती. आरोपीने महिला पोलिसाला उद्देशून, डार्लिंग, तू मला दंड ठोठावण्यासाठी आलीस का? असे विचारले होते. याप्रकरणी न्यायमूर्ती सेनगुप्ता यांनी कलम ३५४ अ (महिलेबद्दल अपमानजनक विधान) याचा संदर्भ देत ही तरतूद लैंगिक छळासंबंधी असल्याचे म्हटले आहे. एखाद्या अनोखळी महिलेबद्दल अशी टिपण्णी करणे, मग ती पोलिस असो वा नसो, एखाद्या पुरुषाने मग तो मद्यधुंद असो वा नसो.. डार्लिंग शब्दाने महिलेला संबोधणं आक्षेपार्ह आहे असे कोर्टाने म्हटले आहे. शिवाय कोर्टाने नमूद केले की, आरोपी व्यक्ती दारुच्या नशेत असल्याचा कोणताही पुरावा नाही. अभिव्यक्तीच्या नावाखाली महिलेबद्दल असे शब्द वापरणे हे समाजातील प्रचलित मानकांनुसार योग्य ठरत नाही. रस्त्यावरील पुरुषाने एखाद्या महिलेसंदर्भात अशी टिपण्णी करणे योग्य नाही.

नेमके प्रकरण काय?
दुर्गापूजेच्या पूर्वसंध्येला पीडित महिला पोलिस हवालदार आणि त्यांची टीम ड्युटीसाठी जात होती. जेव्हा हे पथक वेबी जंक्शनवर पोहोचले तेव्हा तिथे एक व्यक्ती उपद्रव करत होता. पोलिसांनी तेव्हा त्या इसमाला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले. उर्वरित पोलिस पथक रस्त्यावरत थांबलेले होते. तेव्हा एका दुकानासमोर उभ्या असलेल्या आरोपीने पीडित महिलेला डार्लिंग म्हणत तू चलन करायला आलीस का? असे विचारले होते. या प्रकरणी मायाबंदर पोलिस ठाण्यामध्ये कलम ३५४ अ(१)(्र५) आणि ५०९ नुसार गुन्हा नोंदवला होता. कोर्टाने आरोपीला या प्रकरणात दोषी ठरवत तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR