नवी दिल्ली : नरेंद्र मोदी आज तिस-यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. तर महाराष्ट्रातील ६ खासदारांनाही मंत्रिपदासाठी पंतप्रधान कार्यालयातून फोन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये भाजपचे नितीन गडकरी, पीयूष गोयल, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांची मंत्रिपदी वर्णी लागणार आहे.
तर रिपाइंचे रामदास आठवले यांनाही पुन्हा केंद्रात मंत्रिपदाची संधी देण्यात येणार आहे. यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार गटाच्या प्रतापराव जाधवांनाही मंत्रिपदासाठी पंतप्रधान कार्यालयातून फोन आला आहे.
यावेळी प्रतापराव जाधव आणि रक्षा खडसे पहिल्यांदाच केंद्रात मंत्री होणार आहेत. तर पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळांना पहिल्याच टर्ममध्ये मंत्रिपदाची लॉटरी लागली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. मोहोळ यांनी काँग्रेसचे आमदार धंगेकर यांचा पराभव करून पुण्यात विजय मिळवला होता.