24.7 C
Latur
Friday, June 28, 2024
Homeअंतरराष्ट्रीयकॅनडाच्या संसदेत दहशतवादी निज्जरला वाहिली श्रद्धांजली

कॅनडाच्या संसदेत दहशतवादी निज्जरला वाहिली श्रद्धांजली

टोरंटो : कॅनडाच्या संसदेत खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरला श्रद्धांजली वाहिल्यानंतर आता भारताकडून प्रतिक्रिया आली आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी कनिष्क विमान अपघाताचा उल्लेख करुन दहशतवादाच्या मुद्यावरून कॅनडाला आरसा दाखवला. आज कनिष्क विमान अपघाताचा ३९ वा स्मृतिदिन आहे. यानिमित्त भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आज त्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. यासोबतच त्यांनी दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड दमही कॅनडाला दिला.

एस जयशंकर यांनी वर केलेल्या एका पोस्टमध्ये लिहिले की आज इतिहासातील सर्वात वाईट दहशतवादाच्या कृत्यांपैकी एकाची ३९ वा स्मृतिदिन आहे. १९८५ मध्ये आजच्याच दिवशी मरण पावलेल्या एआय १८२ कनिष्कच्या ३२९ प्रवाशांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत. ही जयंती आपल्याला याची आठवण करून देते की, दहशतवाद कधीही खपवून घेतला जाऊ नये.

कॅनडाच्या व्हँकुव्हरमध्ये असलेल्या भारतीय वाणिज्य दूतावासाने १९८५ मध्ये एअर इंडियाच्या कनिष्क विमानात झालेल्या बॉम्बस्फोटात बळी पडलेल्यांच्या स्मरणार्थ एक कार्यक्रम आयोजित करण्याची घोषणा केली आहे. भारत दहशतवादाचा मुकाबला करण्यात आघाडीवर आहे आणि या जागतिक धोक्याचा मुकाबला करण्यासाठी सर्व देशांसोबत जवळून काम करत आहे असे दूतावासाने ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले.

खलिस्तानी दहशतवादी हरदीपंिसग निज्जरच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडाचे संबंध बिघडले आहेत. अशातच मंगळवारी निज्जरच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त कॅनडाच्या संसदेत मौन पाळण्यात आले होते. त्यावरुन एका भारतीय वंशाच्या खासदाराने कॅनडाच्या संसदेतून खलिस्तानी समर्थकांवर जोरदार टीका केली. खासदार चंद्रा आर्य यांनी संसदेला खलिस्तानी दहशतवाद्यांनी कनिष्क विमानाला बॉम्बने उडवल्याचीही आठवण करून दिली.

काय झाले होते तेव्हा?
२३ जून १९८५ रोजी मॉन्ट्रियल, कॅनडातून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान अटलांटिक महासागरावरुन उडताना कोसळले होते. कॅनडास्थित खलिस्तानी दहशतवाद्यांनी या विमानात बॉम्ब ठेवला होता. या हल्ल्यात ३२९ लोक मारले गेले, ज्यात २६८ कॅनडा, २७ ब्रिटिश आणि २४ भारतीय नागरिकांचा समावेश होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR