17.5 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeराष्ट्रीयपाकच्या राजकारणाला दहशतवादाचा कँसर

पाकच्या राजकारणाला दहशतवादाचा कँसर

एस जयशंकर यांचे थेट भाष्य

नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पुन्हा एकदा दहशतवाद्याच्या मुद्यावरुन पाकिस्तानला भरकार्यक्रमात सुनावले. पाकिस्तान सतत दहशतवादाला पाठिंबा देतो. या दहशतवाच्या कँसरने पाकिस्तानच्या राजकारणात शिरकाव केलाय. हा त्यांची संपूर्ण राजकीय व्यवस्था खाऊन टाकतोय. पाकिस्तानच्या कृत्यांमुळे फक्त आपलेच नुकसान होत नाही, तर संपूर्ण उपखंड अस्थिर होत आहे. पाकिस्तानने दहशतवादाचा दृष्टिकोन सोडला पाहिजे अशी प्रतिक्रिया जयशंकर यांनी दिली.

यावेळी त्यांनी भारत चीनचा मुद्दाही उपस्थित केला. ते म्हणाले, भारत आणि चीनचा एकाचवेळी उदय झाल्यामुळे संबंध संतुलित करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. पूर्वीच्या आदर्शवादी आणि दिशाभूल धोरणांमुळे सहकार्य आणि स्पर्धेला अडथळा होता, परंतु गेल्या दशकात भारताचा दृष्टिकोन बदलला आहे. २०२० च्या सीमा विवादामुळे संबंध गुंतागुंतीचे झाले, या समस्या सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

भारताची ताकद मजबूत करण्यावर भर
चीनच्या वाढत्या क्षमतेमुळे निर्माण होणा-या आव्हानांसाठी भारताला तयार राहण्याची गरज आहे. त्यासाठी राष्ट्रीय शक्तीचा जलद विकास होणे आवश्यक आहे. यामध्ये सीमेवरील रचना आणि समुद्राकडे होणारे दुर्लक्ष सुधारावे लागेल. तसेच, संवेदनशील भागातील अवलंबित्व कमी करावे लागेल. भारत आपली एकूण ताकद वाढवण्यावर भर देत आहे. भारताचा दृष्टिकोन परस्पर आदर, परस्पर संवेदनशीलता आणि परस्पर हितावर अवलंबून आहे. भारत-चीन संबंधांच्या दीर्घकालीन विकासाचा केवळ द्विपक्षीय संबंधांवरच नव्हे तर जागतिक व्यवस्थेवरही परिणाम होईल, असेही जयशंकर यावेळी म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR