38.5 C
Latur
Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedदक्षिण मुंबई मतदारसंघात मिलिंद देवरांना उमेदवारी?

दक्षिण मुंबई मतदारसंघात मिलिंद देवरांना उमेदवारी?

मुंबई : प्रतिनिधी
सध्या मिलिंद देवरा शिंदे गटातून राज्यसभेवर खासदार आहेत. मुंबई उत्तर मध्यच्या बदल्यात मुंबई दक्षिण मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. जागावाटपावरून महायुतीत रस्सीखेच सुरूच आहे. मुंबईतील दक्षिण मुंबईच्या जागेवरूनही शिवसेना आणि भाजपमध्ये तिढा कायम आहे. दक्षिण मुंबईतून निवडणूक कोण लढवणार यासाठी अनेक नावे समोर येत आहेत.

मात्र आता मुंबई दक्षिणमधून महायुतीचे मिलिंद देवरा यांना मैदानात उतरवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या देवरा शिंदे गटातून राज्यसभेवर खासदार आहेत. मुंबई उत्तर मध्यच्या बदल्यात मुंबई दक्षिण मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला मिळण्याची शक्यता आहे.

मागील अनेक दिवसांपासून मनसे महायुतीत सामील होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राज ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर मनसे महायुतीत आल्यास बाळा नांदगावकर यांना राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते.

मिलिंद देवरा यांची राज्यसभेची जागा मनसे महायुतीत आल्यास बाळा नांदगावकरांना देण्याची मनसेला ऑफर आहे. मुंबई दक्षिणमधून भाजपचे राहुल नार्वेकर यांनी प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. मात्र अशावेळी त्यांना ऐनवेळी माघार घ्यावी लागेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR