नवी दिल्ली : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने मुशीर खानची भेट घेतली आणि त्याच्या तब्यतीची चौकशी केली. मुशीर खानचा इराणी कप सामन्यापूर्वी रस्ते अपघात झाला होता. या अपघातात त्याच्या मानेला दुखापत झाली असून, सध्या तो दुखापतीतून रिकव्हर होत आहे. यादरम्यान रोहितने मुशीर खान आणि त्याचे वडील नौशाद खान यांची भेट घेतली. ज्याचा फोटो मुशीर खानने सोशल मीडीयावर शेअर केला आहे. या फोटोवर क्रिकेट चाहते भनाट कमेंन्टस करत असून कर्णधार रोहितचे कौतूक करत आहेत.
रोहीत बांगलादेश कसोटी मालिकेनंतर सध्या विश्रांतीवर असून आता न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणा-या कसोटी मालिकेत मैदानात उतरणार आहे. १६ ऑक्टोबरपासून दोन्ही संघांमध्ये ही मालिका खेळवली जाणार आहे. १९ वर्षीय खेळाडू मुशीर खान हा मुंबईचा स्टार खेळाडू म्हणून उदयाला येत आहे. गेल्या महिन्याच्या शेवटी, तो त्याचे वडील नौशाद खान यांच्यासोबत इराणी चषक सामन्यासाठी कानपूरहून लखनौला जात असताना त्याच्या कारला अपघात झाला. यावेळी त्यांची दुभाजकाला धडकून पलटी झाल्याने अपघात झाला, त्यामुळे त्याच्या मानेला गंभीर दुखापत झाली आहे आणि त्याच्या मानेला फ्रॅक्चरही आहे.
मुशीर खानला मैदानात परतण्यासाठी वेळ लागणार आहे. दुखापतीमुळे तो इराणी चषक सामनाही खेळू शकला नाही आणि रणजी ट्रॉफीच्या पहिल्या दोन फे-यांसाठी त्याची संघात निवड झालेली नाही. सुमारे तीन महिने तो क्रिकेटपासून दूर राहणार असल्याचे मानले जात आहे. सर्फराझ खानप्रमाणेच त्याचा भाऊही वडिलांकडून क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले आहे. मुशीर खानने भारतासाठी अंडर-१९ विश्वचषक खेळला आहे आणि आता तो मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे.