23.3 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeसोलापूर२ होटेलचालकांसह ९ मद्यपींविरूद्ध गुन्हे दाखल

२ होटेलचालकांसह ९ मद्यपींविरूद्ध गुन्हे दाखल

सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क माळशिरस विभागाच्या पथकाने मंगळवेढा शहरातील दोन धाब्यांवर टाकलेल्या धाडीत मा न्यायालयाने दोन हॉटेल चालकासह नऊ मद्यपी ग्राहकांना चौपन हजार पाचशे रुपयांचा दंड ठोठावला. तसेच मंगळवेढा-मरवडे रोडवर एका चारचाकी वाहनातून विदेशी दारुच्या वाहतूकीचा गुन्हाही दाखल करण्यात आला.

सविस्तर वृत्त असे की, राज्य उत्पादन शुल्क माळशिरस विभागाच्या पथकाचे निरिक्षक संदिप कदम यांनी मंगळवेढा शहराच्या हद्दीतील होटेल जयभवानी या ढाब्यावर छापा टाकला असता ढाबा मालक कुमार दादा सावंत हा ग्राहकांना मद्य पिण्याची व्यवस्था उपलब्ध करुन देत असतांना आढळून आल्याने त्याचेसह 5 मद्यपी ग्राहक समाधान किसन खवणकर, आप्पासो सिद्धेश्वर जाधव, सोमनाथ अशोक जाधव, आप्पा जायप्पा मोरे व सुनिल बाबूलाल वर्मा यांना अटक करण्यात आली.

एका अन्य कारवाईत दुय्यम निरिक्षक सांगोला कैलास छत्रे यांच्या पथकाने मंगळवेढा शहराच्या हद्दीतील होटेल भैरवनाथ या ठिकाणी छापा टाकून होटेल मालक शुभम सुखदेव जोध व मद्यपी ग्राहक अनिल शेषेराव जाधव, दिपक हरी जाधव, दिपक रामा लोंढे व महेश अरविंद बोरकडे यांना अटक केली. दोन्ही गुन्ह्यातील तपास अधिका-यांनी एकाच दिवसात तपास पूर्ण करून आरोपपत्र न्यायालयात सादर केले असता . न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, मंगळवेढा श्रीमती एस.एन. गंगवाल शाह यांनी हॉटेल मालकांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपये दंड व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी पाचशे रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

याच पथकाने मंगळावेढा-मरवडे रोडवर प्रशांत शंकर भगरे, वय 26 वर्षे, रा. भोसे ता. मंगळवेढा हा त्याच्या मारुती व्हॅन क्र. टऌ13 ऊए 3438 मधून विदेशी दारुची वाहतूक करतांना आढळून आल्याने त्याला ताब्यात घेऊन त्याचेविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्या ताब्यातून विदेशी मद्याच्या 180 मिली क्षमतेच्या इंपेरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या 48 बाटल्या, मॅकडॉवेल नंबर वन व्हिस्कीच्या 48 बाटल्या व रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या 22 बाटल्या व वाहन असा एकूण एक लाख त्रेचाळीस हजार आठशे चौ-यांशी किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक गुणाजी क्षीरसागर, निरिक्षक संदिप कदम, कैलास छत्रे, राजेंद्र वाकडे, सहायक दुय्यम निरिक्षक आवेज शेख, जवान गजानन जाधव, तानाजी काळे, तानाजी जाधव व वाहनचालक मारुती जडगे यांच्या पथकाने पार पाडली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR