21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रराजकीय फायद्यासाठी जात जनगणना करू नये; सुनील आंबेकर

राजकीय फायद्यासाठी जात जनगणना करू नये; सुनील आंबेकर

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या अगोदरपासपून काँग्रेसने देशात जातीय जनगणेची मागणी लावून धरली आहे. आता यावर आरएसएसने देखील भाष्य केले आहे. निवडणुकीचा लाभ मिळवण्यासाठी किंवा राजकीय फायद्यासाठी जात जनगणना करू नये. हिंदू धर्मात जात ही संवेदनशील बाब आहे. याचा निवडणुकीपुरता विचार होऊ नये. कोणाच्या प्रगतीसाठी आवश्यक असेल तर जात जनगणना झाली पाहिजे, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संधाचे प्रसिद्धी प्रमुख सुनील आंबेकर यांनी केले आहे. तर आरएसएसचा जातीय जनगणणेला उघड विरोध असून, त्यांना देश्यातील अल्पसंख्यांना हक्क द्यायचे नाहीत, असा आरोप काँग्रेसने केला आहे.

देशात गेल्या काही दिवसांपासून जातीय जनगणेची मागणी होत आहे. लोकसभा निवडुकीच्या अगोदरपासून काँग्रेस देशभरात जात जनगणनेची मागणी करत आहे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एसी, एसटी आणि ओबीसी साठी ५० टक्के आरक्षण मयार्दा ओलांडण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, सुनील आंबेकर यांनी म्हटले की,जातीची जनगणना हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. त्यामुळे समाजाची एकता आणि अखंडता धोक्यात आली आहे. आपल्या समाजात जातीच्या प्रतिक्रियांचा मुद्दा अत्यंत संवेदनशील असून, तो राष्ट्रीय एकात्मतेसाठी महत्त्वाचाही आहे. परंतु जात जनगणनेचा उपयोग निवडणूक प्रचारासाठी न करता दलित समाजाची संख्या जाणून घेण्यासाठी करण्यात यावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

काँग्रेसने दिले प्रत्युत्तर

दरम्यान, सुनील आंबेकर यांच्या या विधानावर काँग्रेस पक्षाने प्रतिक्रीया दिली आहे. आरएसएसने जात जनगणनेला उघड विरोध केला आहे. जात जनगणना समाजासाठी चांगली नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. या विधानावरून स्पष्ट होते की, भाजप आणि आरएसएसला जात जनगणना करायची नाही. ते दलित, मागासवर्गीय आणि आदिवासींना त्यांचे हक्क द्यायचे नाहीत, मात्र काँग्रेस जात जनगणना करेल असा दावा काँगे्रस नेत्यांनी केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR