27.4 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeराष्ट्रीयसावधान..फूड कंटेनर्समधून कॅन्सरचा धोका!

सावधान..फूड कंटेनर्समधून कॅन्सरचा धोका!

संशोधनातून माहिती समोर प्लास्टिक पूर्णपणे काढून टाकणे अशक्य

नवी दिल्ली : गरमा-गरम….त्याचा दरवळणारा सुगंध…हवा तो आवडणारा पदार्थ…अवघ्या काही मिनिटातंच जेव्हा आपल्या घरी येतो, तेव्हा आपला आनंद गगनात मावेनासा होते. आजकाल मोबाईल आणि इंटरनेटमुळे अनेकांचे जगणे सोपे झाले आहे. कारण या माध्यमातून लोकांना घरबसल्या ब-याच गोष्टी करता येतात. त्यापैकीच एक म्हणजे ऑनलाईन पदार्थ मागवणे… लोकांना ऑनलाइन जेवणाचे इतके व्यसन लागले आहे की, ते घरी स्वयंपाक करणे टाळतात. लहान मूल असो वा प्रौढ प्रत्येकालाच काही मिनिटांत घरी पोहोचणा-या पदार्थांचे व्यसन लागलंय.

हा आपल्या बिघडलेल्या जीवनशैलीचा एक भाग आहे जो शरीराला विविध रोगांचे घर बनवत आहे. विविध ऑनलाइन फूड प्लॅटफॉर्मद्वारे खाद्यपदार्थ काळ्या आणि पांढ-या बॉक्समध्ये वितरित केले जातात. या डब्यांमधून गंभीर आजार होण्याचीही भीती वर्तविण्यात आली आहे.

आज आपल्या जीवनातून प्लास्टिक पूर्णपणे काढून टाकणे अशक्य आहे. आता आपण त्याचा वापर किती कमी करू शकतो हा मुद्दा आहे. सर्वप्रथम, प्लास्टिक इतके धोकादायक का आहे हे समजून घेतले पाहिजे. एफडीएने हे मान्य केले आहे की प्लास्टिक गरम केल्यावर ५५ ते ६० वेगवेगळी रसायने बाहेर पडतात. म्हणून, जेव्हा तुम्ही तुमच्या मायक्रोवेव्हमध्ये प्लास्टिकच्या डब्यात अन्न गरम करता किंवा प्लास्टिकच्या ताटातकिंवा कंटेनरमध्ये गरम अन्न ठेवता, तेव्हा ती उष्णता तुमच्या अन्नामध्ये रसायने सोडू लागते. हे विष आणि रसायने इस्ट्रोजेनमुळे हार्मोनल असंतुलन होते.

विविध आजारांचा सामना
याचा परिणाम पीसीओडी गर्भाशयाच्या समस्या, स्तनाचा कर्करोग, कोलन कर्करोग, प्रोस्टेट कर्करोग आणि बरेच काही यासारख्या आजारांमध्ये होतो. म्हणूनच काही कर्करोगाच्या उपचारांमध्ये हार्मोन थेरपीचा समावेश होतो. जीवनशैली किंवा पारंपारिक उपचारांमुळे तुम्हाला हार्मोनल असंतुलनाचा सामना करावा लागतो तेव्हा तुम्ही हार्मोन थेरपी घेतो. त्यामुळे त्या पातळीवरही हे समजले जाते की, तुमचे हार्मोन्स संतुलित ठेवणे महत्त्वाचे आहे. संशोधन आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, प्लास्टिक पॅकेजिंगमध्ये अन्न वितरण थांबविण्याची विनंती करण्यात येत आहे. यामुळे लोकांना आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवत आहेत.

कसे टाळाल?
जर तुम्ही या कंटेनर्समुळे होणा-या नुकसानापासून स्वत:चे संरक्षण करू शकत असाल, तर तुम्ही पॉलीप्रॉपिलीनपासून बनवलेले प्लास्टिक वापरावे. या कंटेटपासून स्ट्रॉ आणि बाटलीच्या टोप्या बनविल्या जातात. यात रासायनिक प्रतिकारशक्ती आहे, जी कोणत्याही प्रकारच्या अ‍ॅसिडवर प्रतिक्रिया देत नाही. प्लास्टिकच्या कंटेनरऐवजी, तुम्ही काच, स्टील, नैसर्गिक फायबर, बांबू, माती, लाकूडाच्या वस्तू वापरू शकता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR