22.2 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeराष्ट्रीयसीबीएससीकडून दहावी आणि बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर

सीबीएससीकडून दहावी आणि बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर

नवी दिल्ली : सीबीएससीकडून शैक्षणिक सत्र २०२४-२५ साठी परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा १५ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू होतील. बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार २०२५ च्या परीक्षा १५ फेब्रुवारी २०२५ पासून घेण्याचा निर्णय घेतल्या जाणार आहेत. सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक सन्यम भारद्वा यांनी याबाबत माहिती दिली आहे. चालू वर्षाच्या परीक्षा सुद्धा १५ फेब्रुवारीला सुरु झाल्या होत्या. दहावीची परीक्षा २८ दिवसांमध्ये, तर बारावीची परीक्षा ४७ दिवसांमध्ये संपली होती.

दरम्यान, एक दिवसापूर्वीच सीबीएसईने दहावीचा निकाल जाहीर केला असून ९३.६० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलींनी मुलांपेक्षा २.०४ टक्के गुणांनी बाजी मारली आहे. ९४.७५ टक्के मुलींनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. ४७,००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ९५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. २.१२ लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत.

अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार १.३२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना ‘कंपार्टमेंट’मध्ये ठेवण्यात आले असून जे मागील वर्षाच्या तुलनेतकिंचित मागे पडले आहेत. इयत्ता बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल सुद्धा सीबीएसईने जाहीर केला आहे. ८७.९८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत उत्तीर्णतेच्या टक्केवारीत ०.६५ टक्के वाढ झाली आहे. एकूण १८,४१७ शाळांनी ७,१२६ केंद्रांवर सीबीएसई इयत्ता बारावीची परीक्षा घेतली, ज्यामध्ये त्रिवेंद्रम प्रदेशाने सर्वाधिक ९९.९१ टक्के गुण घेतले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR