28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रछ. संभाजीनगरमध्ये आज जनआक्रोश मोर्चा

छ. संभाजीनगरमध्ये आज जनआक्रोश मोर्चा

संतोष देशमुख कुटुंबियांसाठी लोटला जनसमुदाय

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
बीडमधील हत्या प्रकरणावरून राज्याचे राजकारण तापले आहे. मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. यामुळे राज्यातील सत्ताधारी आमदारांसह विरोधकांनी देखील टीकेची झोड उठवली आहे. संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये पूर्ण कारवाई करून त्यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी केली जात आहे.

यासाठी महाराष्ट्राभरामध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. छत्रपती संभाजीनगरमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये संतोष देशमुख यांची हत्या झाल्यामुळे न्यायासाठी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. यासाठी मोठा जनसमुदाय लोटला आहे. या जनआक्रोश मोर्चामध्ये मराठा नेते मनोज जरांगे पाटील सामील झाले आहेत.

त्याचबरोबर भाजप आमदार सुरेश धस देखील आहेत. मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले असून न्यायाची मागणी केली जात आहे. छत्रपती संभाजीनगर येथे होणा-या निषेध मोर्चात देशमुख कुटुंबीय आम्ही सहभागी होणार आहोत. गरज पडली तर आमचं कुटुंब थांबणार नाही. समित्या स्थापन झाल्या आहेत. त्यांच्याकडून एकच अपेक्षा आहे न्याय भेटला पाहिजे. अजित पवारांकडून अपेक्षा आहे, असे मत संतोष देशमुख यांच्या परिवाराकडून व्यक्त केले जात आहे.

बीड हत्या प्रकरणामध्ये सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे. या कृष्णा आंधळेचा तपास सुरू आहे. वाल्मिक कराड याच्यासह इतरांवर मोक्काही लावण्यात आला आहे. दुसरीकडे बीडच्या पालकमंत्रिपदाची सूत्रे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हाती घेतील आहेत. तरीही या प्रकरणातील संताप संपलेला दिसत नाही. ज्या क्रूर पद्धतीने ही हत्या करण्यात आली आणि सुरुवातीला प्रकरण ढिलाईने हाताळण्यात आले त्यावरून संताप कायम असल्याचे दिसून येते. दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये आज जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR