28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeराष्ट्रीयचंपाई सोरेन झारखंडचे नवे मुख्यमंत्री

चंपाई सोरेन झारखंडचे नवे मुख्यमंत्री

रांची : जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या निशाण्यावर असलेल्या झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी अखेर राजीनामा दिला आहे. त्यांना अटक करण्याचा निर्णयही ईडीने घेतल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे, चंपाई सोरेन आता झारखंडच्या नवीन मुख्यमंत्री बनले आहेत. चंपाई सोरेन यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. तसेच हेमंत सोरेन १५ दिवस रांचीमध्ये ईडीच्या कोठडीत राहू शकतात अशीही माहिती समोर आली आहे. बुधवारी दुपारी दीड वाजल्यापासून कणके रोडवरील राहत्या घरी त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) आणि काँग्रेसचे आमदार राजभवनात पोहोचले आहेत. सायंकाळी उशिरा सत्ताधारी आघाडीचे सर्व आमदार रांची येथील राजभवनात पोहोचले. सध्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव पुढे आले आहे. चंपाई सोरेन हे हेमंत सोरेन यांच्या जवळचे असल्याचे सांगितले जाते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR