27.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeराष्ट्रीयअग्निपथ योजनेत फेरबदलाच्या हालचाली!

अग्निपथ योजनेत फेरबदलाच्या हालचाली!

मोठा फेरबदल?, विरोधकांच्या टीकेनंतर केंद्र सरकारने बदल सुचविल्याची माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सरकारी कर्मचा-यांना युनिफाइड पेन्शन योजना जाहीर केल्यानंतर मोदी सरकार आता अग्निपथ योजनेत मोठा बदल करण्याची योजना आखत असल्याची माहिती उच्च पदस्थ अधिका-यांकडून मिळाली आहे. अलीकडेच अग्निपथ योजनेवरून राजकीय वातावरण तापल्याचे दिसत होते.

याबाबत उच्चस्तरीय अधिका-यांनी माहिती दिली की, अग्निपथ भर्ती योजनेत काही बदल केल्यास योजनेचा खरा उद्देश कमी होईल आणि भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण होवू शकतो. तरीसुद्धा विरोधकांच्या टीकेनंतर केंद्र सरकार अग्निपथ योजनेत काही मोठे बदल करण्याची शक्यता आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अग्निपथ योजनेवरून संसदेत सवाल केला होता. केंद्र सरकारनेसुद्धा हेच प्रकरण नीट हाताळण्यासाठी आता काही बदल सूचवले आहेत, अशी माहिती मिळत आहे.

अग्निपथ योजना सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. अशातच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हरियाणा, महाराष्ट्र आणि जम्मू-काश्मीर राज्यात अग्निपथ योजना विरोधक निवडणुकीचा अजेंडा बनवू शकतात. म्हणून केंद्र सरकार काही बदल करण्याच्या तयारीत आहे. काही वर्षांपासून तरुणांना सशस्त्र दलात भरती केले जात आहे. सशस्त्र दलात तरुणांना भरती करुन घेत त्यांना लढाईसाठी सज्ज करण्यात येत आहे. पण एका उच्चपदस्थ अधिका-याच्या म्हणण्यानुसार ही योजना चीनशी मुकाबला करण्याच्या भारताच्या रणनीतीचा एक भाग आहे. वादग्रस्त सीमा भागात लढण्यासाठी लष्कराला तरुण सैनिकांची गरज आहे, त्यासाठीच अग्निपथ योजना लागू करण्यात आले होती.

अग्नीपथ योजना १७ ते २१ वयोगटातील व्यक्तींना प्रामुख्याने केंद्रित करते. तरुण आणि अधिक चपळ सैन्य यामुळे भारतीय लष्काराला मिळते. २०२० च्या गलवान व्हॅलीमध्ये भारतीय आणि चिनी सैन्यादरम्यान झालेल्या संघर्षाचा संदर्भ देत अधिका-याने काही नैसर्गिक प्रदेशांमध्ये लढाईच्या अडचणींवर प्रकाश टाकला आहे. अशा भूभागात शत्रूला गुंतवणे आव्हानात्मक आहे. आमच्या पायदळ सैनिकांचे सरासरी वय २९ वर्ष आहे. परंतु ते २१ वर्षांच्या जवळ असणे आवश्यक आहे. म्हणून केंद्रांने योजना आणली. अग्निपथ योजनेंतर्गत केवळ १७ ते २१ वयोगटातील तरुण पुरुष आणि महिला भरतीसाठी पात्र आहेत.

तरुणांना युद्धासाठी सज्ज ठेवण्याचा हेतू
सशस्त्र दलात तरुणांना युद्धासाठी सज्ज ठेवण्याच्या दुहेरी उद्देशाने अग्निपथ योजना केंद्र सरकारने आणली आहे. योजनेअंतर्गंत चार वर्षांसाठी तरुणांना सैन्यात भरती केले जाते, त्यानंतर सैन्य दलात २५ % सेवेसाठी दाखल करुन घेतले जाते. सशस्त्र दलातील जवानांचे सरासरी वय कमी असणे आणि त्यांना चीनने उभ्या केलेल्या आव्हानांसाठी तयार करणे हा अग्निपथ योजनेचा हेतू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR