मुंबई : चेतेश्वर पुजारा सध्या भारतीय कसोटी संघात नाही. मात्र त्याने रणजी ट्रॉफी २०२४ चा हंगाम गाजवत सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. त्याने नुकतेच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २० हजार धावा पूर्ण केल्या.
सुनिल गावसकर, सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्यानंतर आता चेतेश्वर पुजाराने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २०,००० धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २० हजार पेक्षा जास्त धावा करणा-या भारतीय खेळाडूंमध्ये सुनिल गावसकर, सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्यानंतर आता चेतेश्वर पुजाराचा समावेश झाला आहे. पुजाराने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतके ठोकण्याचा विक्रम देखील आपल्या नावावर केला आहे. त्याच्या नावावर आतापर्यंत १७ द्विशतकी खेळींचा समावेश आहे.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २० हजार धावा
करणारे भारतीय खेळाडू खालीलप्रमाणे…
– सुनिल गावसकर – २५,८३४ धावा
– सचिन तेंडुलकर – २५,३९६ धावा
– राहुल द्रविड – २३,७९४ धावा
– चेतेश्वर पुजारा – २०,०१३ धावा