पालघर : मालवण इथल्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावण ढवळून निघाले आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढवण इथल्या जाहीर कार्यक्रमातून माफी मागितली आहे. सिंधुदुर्गात जे काही झाले ते माझ्या सर्व सहका-यांसाठी दु:खदायक असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.
मोदी म्हणाले भाजपने मला सर्वांत आधी पंतप्रधान म्हणून निवडले तेव्हा मी सर्वप्रथम रायगडच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झालो होतो. पण गेल्या काळात सिंधुदुर्गात जे झाले ते माझ्या सर्व सहका-यांना याचे वाईट वाटले. आमच्यासाठी शिवाजी महाराज हे केवळ राजे-महाराजे नाहीत तर महाराष्ट्राचे कर्तेधर्ते आहेत. आज मी डोकं झुकवून माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणात मस्तक ठेऊन माफी मागतो, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.