22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeछत्रपती संभाजीनगरछत्रपती संभाजीनगरमधील उद्योजकाचा व्यायाम करताना मृत्यू

छत्रपती संभाजीनगरमधील उद्योजकाचा व्यायाम करताना मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : माणसाचे जीवन धकाधकीचे बनले असून वेळेअभावी माणूस शरिराकडे, प्रकृतीकडे लक्ष देत नसल्याची ओरड सातत्याने ऐकायला मिळते. मात्र, काहीजण आपल्या तब्येतीकडे अधिक काळजीपूर्वक लक्षही देत असतात. त्यानुसार, दैनंदिन व्यायामासाठी किंवा योगासनाद्वारे आपले शरीर तंदूरुस्त ठेवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, यापूर्वीही काहीवेळा जिममध्ये ट्रेनर किंवा जिममध्ये व्यायाम करताना ह्रदयविकाराचा झटका येऊन मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. आता, छत्रपती संभाजीनगरमध्येही अशीच एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. ज्यामध्ये, जिममधील आपल्या सहकारी मित्रांसमवेत व्यायाम करताना ह्रदयविकाराचा झटका येऊन एका उद्योजकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

छत्रपती संभाजी नगर शहरातील एका जिम मध्ये व्यायाम करत असताना एका उद्योजकाला हृदयविकाराचा झटका आला, त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सीम्रन मोटरचे मालक कवलजीत सिंग बग्गा हे आपल्या काही सहका-यांसोबत नेहमीप्रमाणे व्यायाम करण्यासाठी जिम मध्ये गेले होते. मात्र, व्यायाम करत असतानाच ते अचानक खाली कोसळले आणि त्यांचा काही क्षणातच मृत्यू झाला. जिममध्ये ते खाली कोसळल्यानंतर त्यांच्या सहका-यांनी धावाधाव केली, त्यानंतर त्यांना रुग्णालयातही नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, हा मृत्यूचा सगळा थरार जिममध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे. या घटनेचा व्हीडीओ समोर आल्यानंतर माणसाच्या जीवाचा खरंच काही भरोसा नाही, हेच वाक्य प्रत्येकाच्या तोंडातून बाहेर निघेल. कारण, जिममध्ये कललजीतंिसग बग्गा हे आपल्या सहका-यांसमवेत व्यायाम करताना एकदत तंदुरुस्त आणि फट दिसून येतात. विशेष म्हणजे व्यायाम करतानाही त्यांची शरीरयष्टी पाहून असा काही प्रकार घडेल असे कोणालाही वाटत नाही. मात्र, काही वेळातच त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ते बाजूला गेल्याचे दिसून येते. त्यानंतर, ते खाली कोसळतात आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे व्हीडीओत दिसून येते. या अकस्मात निधनामुळे त्यांच्या जिममधील सहका-यांना मोठा धक्का बसला असून बग्गा कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR