इम्फाळ : हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्या ताफ्यावर अतिरेक्यांनी आज हल्ला केला आहे. दरम्यान या हल्ल्यातून मुख्यमंत्री बचावले आहेत. कारण मुख्यमंत्र्यांचा या ताफ्यात समावेश नव्हता.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग मंगळवारी हिसाचारग्रसत जिराबाम जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जाणार होते. त्यापुर्वी त्यांच्या आगाऊ सुरक्षा दलावर आज सकाळी हल्ला करण्यात आला यात दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर मणिपूर पोलिस कमांडो आणि आसाम रायफल्सने एक संयुक्त पथक तयार केले असून गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम राबवली जात आहे. उल्लेखनीय आहे की मंगळवारी मुख्यमंत्री एन बिरेन सिंह हिंसाचारग्रस्त जिरीबामला भेट देणार होते. या संदर्भात मुख्यमंत्र्यांचे आगाऊ सुरक्षा पथक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिरीबाम येथे जात होते. दरम्यान, अतिरेक्यानी सिनमजवळ हल्ला केला. मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून, हा निरपराधांवर केलेला रानटी हल्ला आहे, असे ते म्हणाले.