27.8 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeउद्योगदर १५ दिवसांत सिबील स्कोअर होणार अपडेट

दर १५ दिवसांत सिबील स्कोअर होणार अपडेट

नियमांत होणार बदल, १ जानेवारी २०२५ पासून नियमांत होणार बदल, अधिक काळजी घ्यावी लागणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कर्ज मिळवण्यासाठी सिबील स्कोर असणे खूप महत्वाचे असते. सिबील स्कोर चांगला असल्यास कर्ज मिळवण्यात अडचण येत नाही. दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याबाबतच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. आता नवीन नियमानुसार ग्राहकांचा सिबील स्कोर प्रत्येक १५ दिवसांनंतर अपडेट केला जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांना त्यांचा सिबील स्कोर चांगला ठेवावा लागणार आहे. दरम्यान, हा नवीन नियम १ जानेवारी २०२५ पासून लागू केला जाणार आहे.

त्यासाठी या नवीन सिबील स्कोरच्या संदर्भात माहिती असणे गरजेचे आहे. सिबील स्कोर खराब असेल तर तुम्हाला पुढच्या वेळी कर्ज मिळविण्यासाठी बँकांमध्ये फे-या माराव्या लागतील. जे लोक वेळेवर कर्जाची परतफेड करणार नाहीत, त्यांना हा फटका बसणार आहे. दर १५ दिवसानंतर ग्राहकांचा सिबील स्कोर अपडेट केला जाणार आहे. त्यामुळे वित्तीय संस्थांनी लवकरात लवकर क्रेडीट स्कोअर अपडेट करावा, असे आरबीआयने म्हटले आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याबाबतची माहिती दिली.
सिबील स्कोर हा दर महिन्याच्या १५ तारखेला आणि महिन्याच्या शेवटी अपडेट केला जाऊ शकतो. क्रेडिट संस्था आणि क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्या त्यांच्या इच्छेनुसारदेखील तारखा निश्चित करु शकतात. ज्या अंतर्गत डेटा अपडेट केला जाऊ शकतो. क्रेडिट संस्थांनी ग्राहकांची क्रेडिट माहिती दर महिन्याला सीआयसी यांच्याकडे सबमिट करणे आवश्यक आहे. दरम्यान, या निर्णयाचा बँक आणि ग्राहक या दोघांनांही फायदा होणार आहे.

चांगला स्कोअर असेल तर कमी व्याजदरात कर्ज
बँक आणि एनबीएफसी या दोन्हींसाठी क्रेडिट माहिती खूप महत्वाची आहे. याद्वारे ते कोणाला कर्ज द्यायचे आणि कोणाला देऊ नये, याबद्दल अधिक चांगला निर्णय घेऊ शकतात. यामुळे कर्जावर आकारण्यात येणारा व्याजदर ठरवण्यातदेखील मदत होणार आहे. चांगला क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांना कमी दरात कर्ज मिळू शकतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR