पुणे : खंडणीच्या गुन्हामध्ये सीआयडीला शरण आलेल्या वाल्मिक कराड याने दुस-या पत्नीच्या नावे पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडवरील एका इमारतीमध्ये दोन ऑफिस घेतले आहे. या मालमत्तेप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक दत्ता खाडे यांची बीड जिल्हयातील केज येथे सीआयडीने चौकशी केली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणांचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड असल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. त्यातच एका खंडणीच्या गुन्हामध्ये सीआयडीला शरण आलेल्या वाल्मिक कराडचे पुण्यातील कॉलेज रोडवरील एका इमारतीमध्ये दोन ऑफिस दुसरी पत्नीच्या नावे आहेत.
हा व्यवहार भाजपचे माजी -नगरसेवक दत्ता खाडे यांच्या मध्यस्थीने झाल्याचा सीआयडीला संशय आहे. वाल्मिक कराड याने पुण्यामध्ये देखील बेनामी संपत्ती जमवल्या असल्याचा सीआयडीला संशय आहे. त्याच अनुषंगाने पुण्यातील भाजपचे माजी नगरसेवक दत्ता खाडे यांची केज येथे सीआयडीकडून चौकशी करण्यात आली.