22.9 C
Latur
Friday, July 26, 2024
Homeमहाराष्ट्रनाशकात पोलिसांचा कडेकोट पहारा

नाशकात पोलिसांचा कडेकोट पहारा

नाशिक : लोकसभा निवडणुकीतील नाशिक, दिंडोरी मतदारसंघात शनिवारी (ता. १८) सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावताच शहर-जिल्ह्यातील पोलिसांनी आगामी दोन दिवसांसाठी कडेकोट पहा-याची सज्जता केली आहे. शहर पोलिस आयुक्तालय हद्दीत सुमारे चार हजार पोलिस अंमलदार-अधिकारी. तर नाशिक जिल्ह्यात सुमारे नऊ हजार पोलिस अंमलदार-अधिका-यांच्या सशस्त्र बंदोबस्तासह रविवारी (ता. १९) पहाटे मतदान केंद्रांचा (बूथ) ताबा घेणार आहेत.

यामुळे जिल्ह्यातच नव्हे, तर शहराला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. नाशिक, दिंडोरी आणि धुळे मतदारसंघासाठी सोमवारी (ता. २०) मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील मतदान केंद्रनिहाय पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, तर ग्रामीण पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक ग्रामीणमध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्ताची सज्जता करण्यात आली आहे.

नाशिक शहर आयुक्तालय हद्दीत एक हजार २२७ मतदान केंद्रे असून, त्यासाठी सुमारे चार हजार पोलिस अंमलदार-अधिका-यांचा बंदोबस्त तैनात असणार आहे. आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश राज्यातील राखीव पोलिस दलाचे एक हजार अंमलदार, गृहरक्षक दलाचे एक हजार जवान यांच्यासह लातूर, गोंदिया, गडचिरोली येथील पोलिस अंमलदार.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR