22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात ढगफुटी

पुण्यात ढगफुटी

पुणे : पुण्यात शनिवार दि. ८ जून रोजी जोरदार पावसाला सुरुवात होऊन ढगफुटी झाली. विक्रमी पावसाने वादळी वा-यासह लावलेल्या हजेरीमुळे पुण्यातील ३१ ठिकाणी झाड पडली आहेत. आज संध्याकाळी झालेल्या ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसामुळे पुण्यात ३१ ठिकाणी झडपडीच्या घटना घडल्या आहेत.

दरम्यान, पावसामुळे अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पुण्यावर उंच ढगांची निर्मिती सुरू असून कमी वेळात अधिक पाऊस झाल्याने काही ठिकाणी फ्लॅशफ्लड सारखी स्थिती आहे. तसेच झाडे पडणे, भिंती पडणे, घरांमध्ये पाणी शिरणे आदी घटना शक्य असून पाणी ओसरेपर्यंत घराबाहेर पडू नये. पुण्यातील पावसाच्या स्थितीसंदर्भात आपण महापालिका अधिका-यांच्या संपर्कात असून आवश्यक तेथे आपत्कालीन यंत्रणा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, असे पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ म्हणाले.

पुण्यात कोठे आणि किती पाऊस?
शिवाजीनगर एडब्लूएस : १०३
सदाशिव पेठ : ९३
कोथरुड : ९१
सिंहगड रोड : ७४
पाशाण : ६५
बावधन : ४८
बिबवेवाडी : ५६
खराडी : ३१
एनडीए : ४१
वाघोली : ४४
लोहगाव : १८.६ एमएम
कोठे कोठे झाडे पडली?
येरवडा, नागपुर चाळ
कोथरुड बस स्टैंड
सिहंगड रोड, दामोदर नगर
शिवाजीनगर, सावरकर भवन
सहकार नगर, तावरे कॉलनी
सेनापती बापट रोड
गणेश ंिखड रोड, ई स्क्वेअर
कोंढवा खुर्द, भैरवनाथ मंदिर
मार्केटयार्ड, संदेश नगर
कल्याणीनगर, गुरूनानक डेअरी
येरवडा, सैनिक नगर
नवी पेठ
सुखसागर नगर, आई माता मंदिर
पर्वती दर्शन
शुक्रवार पेठ, मामलेदार कचेरी
विमाननगर
रास्ता पेठ, दारुवाला पुल
एरंडवणा, महादेव मंदिर
पद्मावती, ट्रेझर पार्क
खडकी, रेंजहिल चौक
भवानी पेठ, रामोशी गेट
एरंडवणा, खिलारेवाडी
जंगली महाराज रोड
वाकडेवाडी, पीएमसी कॉलनी
कोथरुड, करिश्मा सोसायटी
कोथरुड, मयुर कॉलनी
येरवडा क्षेञिय कार्यालय
विमानतळाजवळ
लोहगाव, पवार वस्ती
धानोरी
गोखलेनगर

अतिप्रमाणात पाणी साचलेले परिसर
पाषाण, बी यु भंडारी शोरूम जवळ
सिहंगड रोड दोन ठिकाणी
सेंट्रल मॉल समोर
नारायण पेठ, अष्ठभुजा मंदिर जवळ
खडकी, गुरुव्दाराजवळ
एरंडवणा, गणेशनगर
राजेन्द्र नगर
कसबा पेठ, कुभांर वाडा

नागरिकांनी बाहेर पडू नये : पालकमंत्री अजित पवार
पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीही पावसाच्या घटनेची जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेतली असून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आलंय. शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांना नदीचे स्वरूप आले असून शिवाजी नगर, अलका टाकीज चौक, कोथरुड, कात्रज, सिंहगड रोड यासह अनेक परिसरात रस्ते तुंबल्याचे दिसून आले. पुणे शहरातील मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

पहिलाच पाऊस ढगफुटी : पाटील
पुण्यातील पहिलाच पाऊस ढगफुटी झाली. पुण्यातील अनेक भागात पावसामुळे पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. महापालिकेची सगळी यंत्रणा कामाला लागली आहे. या ढगफुटी सदृश्य परिस्थितीत प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत आपण काळजी करू नका. सगळ्या नुकसानाची नुकसानभरपाई केली जाणार आहे. पुण्यात ज्या ठिकाणी नुकसान झाल आहे हे कळेल मात्र नुकसान झाल्याची माहिती द्यायची असेल तर त्यांनी हेल्पलाईन नंबरवर संपर्क करावा, असे आवाहन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR